पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखीमार्गावरील भूसंपादन सुरू झाले आहे. त्यासाठी या मार्गात येणारे एक दोनमजली घर चक्क नऊ फूट मागे सरकविण्याचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घर न पाडता जसेच्या तसे हलविता येते. याच तंत्राच्या सहाय्याने ही इमारत उचलून नऊ फूट मागे हलविण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील मासाळवाडी परीसरातील मुलाणी कुटुंबीयांनी वडिलांची आठवण जपण्याचा निर्णय घेतला. मुलाणी कुटुंबियांनी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तू उभी केली होती.पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत उध्द्वस्त करायला या कुटुंबाचे धाडस झाले नाही. कारण चार वर्षा पूर्वी अकबर मुलाणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण म्हणून ही इमारत असून ती तशीच ठेवायची होती. ती आठवण जतन करण्याची जिद्द या कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यामुळे पालखी महामागार्ला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरू केला आहे. ती इमारत पाठीमागे घेण्याचे काम सुरू आहे.
मासाळवाडीतील पहिलाच प्रयोग
मुलाणी कुटुंबीयाचे घर जसेच्या तसे हलविण्याचे कंत्राट घेणाऱ्या मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजाराहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारचा मासाळवाडी परिसरातील हा पहिलाच प्रयोग आहे.
https://twitter.com/jitendrazavar/status/1638019814508707841?s=20
Double Floor Building Lift 9 Feet New Technique Video