पुणे – दरवर्षी घराघरात चैतन्य घेऊन येणारा दिवाळी हा सण. नरकचतुर्दशीच्या आधी धनत्रयोदशी असते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. नागरिक सोने-चांदी, भांडी आणि अनेक वस्तू खरेदी करतात. धनत्रयोदशीला खरेदी केल्यास धनवृद्धी होते, असे आपल्या शास्त्रात म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी बाजारात चांगलीच गर्दी असते. परंतु खरेदी करताना कोणत्या वस्तू किंवा गोष्टी खरेदी करू नये याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का. नसेल ठाऊक तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काच किंवा काचेच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काच किंवा काचेच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. काचेचा राहू ग्रहाशी संबंध आहे. त्यामुळे काचेच्या वस्तू खरेदी करू नये असे म्हटले जाते.
टोकदार वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी टोकदार वस्तू खरेदी करू नये. त्यामध्ये चाकू, कात्री, तलवारसारख्या वस्तूंचा समावेश आहे. ज्या वस्तूंना धार असते म्हणजेच त्या धारधार असतात अशा वस्तू खरेदी करू नये.
लोखंडी वस्तू
धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या दिवशी लोखंडी वस्तू जसे खिळे, लोखंडी छडी आणि इतर वस्तू खरेदी केल्या तर त्या कुटुंबावर अशुभ छाया पडू शकते असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.
काळ्या वस्तू
धनत्रयोदशीला काळ्या वस्तू खरेदी करणे टाळावे. काळे कपडे, काळे बूट, कोळसा आदी वस्तू खरेदी करू नये. अशा वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे त्या खरेदी न केलेल्याच बर्या.