नागपूर – जगभरातील कोट्यवधी नागरिक अँड्रॉइड फोन वापरत आहेत. या फोनमध्ये अनेक छुपी वैशिष्ट्ये आपल्याला क्वचितच माहिती असतात. साधारणपणे असे दिसून येते की जेव्हा आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये काही कोड नंबर डायल करतो, तेव्हा फोनशी संबंधित अनेक माहिती आपल्या समोर येते. परंतु काही वेळा चुकीचा नंबर डायल केला तर आपल्या फोन मध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो किंवा डेटा देखील डिलीट होऊ शकतो.
आपण मोबाईल फोनमध्ये चुकूनही डायल केले जाऊ नयेत, म्हणून काळजी घ्यावी, कारण तो नंबर डायल केल्यास, तुमचा फोन काही क्षणात रीसेट होईल. फोन रीसेट केल्यानंतर, तुमचा सर्व महत्त्वाचा डेटा पुसला जाऊ शकतो.
तुम्ही चुकून *2767*3855# नंबर डायल केला तर तुमचा फोन रीसेट होईल. तसेच आपला सर्व महत्वाचा डेटा फोनवरून हटवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हा नंबर कधीही डायल करू नका.
आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये असे अनेक डायल कोड आहेत, ज्याच्या मदतीने फोनबद्दल बरेच काही जाणून घेता येते. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये *# 07# डायल केल्यास तुम्हाला त्याच्या विशिष्ट एसएआर मूल्याबद्दल माहिती मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या मोबाईल कॅलेंडरमध्ये किती स्टोरेज समाविष्ट आहे हे तपासू शकता यासाठी #*#225#*#* हा कोड डायल करावा, त्याचवेळी, *#*#4636#*#* या कोडद्वारे, आपण फोनच्या बॅटरी आणि नेटवर्क आकडेवारीबद्दल माहिती गोळा करू शकता. परंतु कोणताही नंबर डायल करताना काळजी घेणे आवश्यक आहे .