इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्रायल आणि इराण यांनी यावर पूर्णपणे सहमती दर्शविली आहे की १२ तासांसाठी एक पूर्ण आणि संपूर्ण युद्धबंदी (आतापासून सुमारे ६ तासांत, जेव्हा इस्रायल आणि इराण त्यांचे अंतिम मोहिमा पूर्ण करतील!) होईल, ज्या टप्प्यावर युद्ध संपले आहे असे मानले जाईल! अधिकृतपणे, इराण युद्धबंदी सुरू करेल आणि १२ व्या तासाला, इस्रायल युद्धबंदी सुरू करेल आणि २४ व्या तासाला, १२ दिवसांच्या युद्धाचा अधिकृत अंत जगाकडून केला जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
ट्रंप यांनी म्हटले आहे की, प्रत्येक युद्धबंदी दरम्यान, दुसरी बाजू शांत आणि आदरणीय राहील. सर्वकाही जसे पाहिजे तसे कार्य करते, जे ते करेल या गृहीत धरून, मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे, त्यांच्याकडे सहनशक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता आहे, ज्याला “१२ दिवसांचे युद्ध” म्हटले पाहिजे, समाप्त करण्यासाठी अभिनंदन करू इच्छितो. हे एक असे युद्ध आहे जे वर्षानुवर्षे चालू राहू शकले असते आणि संपूर्ण मध्य पूर्व नष्ट करू शकले असते, पण ते झाले नाही आणि कधीही होणार नाही! देव इस्रायलला आशीर्वाद देवो, देव इराणला आशीर्वाद देवो, देव मध्य पूर्वेला आशीर्वाद देवो, देव अमेरिकेला आशीर्वाद देवो आणि देव जगाला आशीर्वाद देवो असे त्यांनी म्हटले आहे.

इराणचा कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला
दरम्यान इराणने अल उदीद या कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करत बदला घेतला आहे. या ठिकाणी इराणने १४ बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याची माहिती समोर आली आहे. कतारची राजधानी दोहापासून हे ठिकाण जवळ आहे. या ठिकाणी आठ हजाराहून अधिक अमेरिकन सैन्य तैनात असते. त्याच ठिकाणी इराणने हल्ला केला आहे. तसेच इराणने बहरीनमधील लष्करी तळांनाही लक्ष्य केल्याची माहिती आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यानंतर लष्करी तळाच्या मुख्य प्रवेशव्दारावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या हल्लानंतर अमेरिकेने त्यावर प्रतिक्रिया दिली. १४ पैकी १३ हल्ले निष्क्रिय केले.अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईड हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लियर सुविधआ असलेल्या फोर्डो, नटनझ आणि इस्फाहान या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्याचा बदला अवघ्या ३६ तासात इराणने घेतला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर अमेरिकेने मात्र कोणतेही प्रत्त्य़त्तर न देण्याची घोषणा केल्याची चर्चा आहे. पण, यानंतर कोणताही हल्ला केला तर त्याला उत्तर दिले जाईल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे आखाती देशांमध्ये १९ ठिकाणी तळ आहेत. अमेरिकेने सिरीया, कतारसाऱख्या देशांमध्ये मोठे तळ बांधलेले आहेत. मध्ये पूर्वेत ५० हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आता इराणने हल्ला केल्याने या तळांना धोका वाढला होता.