विशेष प्रतिनिधी, मुंबई
येत्या १ जूनपासून देशातील विमान प्रवास महागणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे सध्या बहुतांश उड्डाणे बंद आहेत. १ जूननंतरही कोरोनाचे निर्बंध राहणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने हवाई भाड्यात १३ ते १६ टक्के वाढ केली आहे. ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी २६०० रुपये, ६० ते ९० मिनिटांच्या प्रवासासाठी ४ हजार रुपये, ९० ते १२० मिनिटांसाठी ४ हजार ७०० रुपये दर आकारले जाणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३० जूनपर्यंत भारतात बंद राहणार आहे. देशांतर्गत प्रवास मात्र सुरू राहणार आहे. त्यातही आता दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम विमानसेवेवर होणार आहे.
विमानसेवेचे दरपत्रक पुढीलप्रमाणे