डोंबिवली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती-पत्नी मध्ये प्रेमाचे संबंध असेल तर संसार सुखाचा होतो. मात्र त्यांच्यामध्ये वाद आणि संशय निर्माण झाला तर त्या सुखाला दृष्ट लागते, आणि त्यातून मग संशय रागातून काहीही विपरीत घटना घडते .डोंबिवलीमध्ये एका दांपत्यच्या बाबतीत अशीच घटना घडली. साधारणतः ५० ते ६० या वयातील पती-पत्नीमध्ये काही कारणामुळे पटत नव्हते. लग्नाच्या वाढदिवशीच पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, बेडरूममध्ये पत्नी झोपत नसल्याच्या रागातून त्याने तिच्यावर वार केले.
म्हात्रेनगरमधील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवलीच्या पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात म्हात्रेनगर मधील एका इमारतीत सुरेश पैलकर हा इसम आपल्या तरुण मुलगा सुरज (वय २६) याच्यासह राहतो. गेल्या दोन वर्षांपासून पत्नी आणि पतीमध्ये घरगुती वाद असल्याने त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी सुलोचना पैलकर ही आपल्या माहेरी कर्नाटक येथे राहत आहे. त्यातच या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने पत्नी माहेरहून डोंबिवलीतील सासरच्या घरी आली होती.
पती बेडरुममध्ये गेला
सायंकाळी लग्नाचा वाढदिवस आंनदात साजरा केल्यानंतर पती हा आपल्या बेडरूममध्ये रात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी गेला होता. त्यावेळी पत्नी ही त्यापुर्वीच दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. पतीने पत्नीला आपल्या बेडरूममध्ये सोबत झोपण्यासाठी सांगूनही ऐकले नाही म्हणून दोघांमध्ये भांडण झाले. याच भांडणातून हल्लेखोर पतीने घरातील धारदार सुरीने पत्नीवर वार केले. त्यात मध्यस्थी करण्यासाठी त्यांचा मुलगा आला असता, सुरेशने त्यालाही मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस ठाण्यात हल्लेखोर पतीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करीत आहेत.
लग्नाच्या वाढदिवसासाठी आली
पतीशी पटत नसल्याने पत्नी कर्नाटक प्रांतातील आपल्या माहेरी राहत होती, मात्र लग्नाचा वाढदिवस असल्याने ती डोंबिवली येथे आपल्या पतीकडे आली होती. तिचा पती आणि त्यांचा तरुण मुलगा येथे राहतात. वाढदिवस साजरा केल्यानंतर पतीने पत्नीला आपल्या बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले, परंतु ती दुसऱ्या रूममध्ये झोपली. त्यामुळे रागाच्या भरात पतीने पत्नीवर तलवारीने वार केले. त्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली, त्यातच हे भांडण तथा वाद सोडविण्यासाठी आलेल्या मुलाला देखील या इसमाने हल्ला करीत मारहाण केली.
Dombivli Crime Husband Attack Murder Wife
Mumbai Police Sharp Weapon Wedding Anniversary