नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाळीव प्राणी हे अनेकांच्या घरातील महत्वाचे अंग आहे. पाळीव प्राण्यांमुळे घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. म्हणूनच अशा श्वान प्रेमीसाठी रविवारची (२६ फेब्रुवारी) ची संध्याकाळ विविध प्रजातीच्या श्वान बघण्याची एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे.
श्वानप्रेमी व नाशिककरांना एकाच ठिकाणी श्वानांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्रंबक रोड वरील ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट आणि डॉ. दिग्विजय पाटील्स, पैट परफेक्ट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या ‘पॉ फेस्ट’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या डॉग शो मध्ये कुत्रे आणि त्यांच्या पालकांसाठी मजा आणि खेळ देखील आयोजित करण्यात आले आहे. याच सोबत ज्यांना कुत्रे पाळायची इच्छा आहे त्यांना देखील ब्रीड कशी निवडावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या निमिताने कुत्र्यांना समाजात वावरण्याची सवय होते तसेच त्यांची निगा, त्यांचे अन्न त्यांचे प्रशिक्षण याबाबत येथे मार्गदर्शन करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त श्वान प्रेमींनी व नाशिककरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधावा- 7030113008
Dog Show in Nashik on Sunday Good Opportunity