विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कधी नव्हे इतकी गंभीर परिस्थिती सर्वांनीच अनुभवली. यादरम्यान अनेकांना रुग्णालयात बेड मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी स्मशानभूमी किंवा कब्रस्तानात अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडली. दुसऱ्या लाटेत गेल्या वेळेपेक्षा मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामध्ये अनेक डॉक्टरांनीही जीव गमावले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात किमान ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने मंगळवारी दिली. यामध्ये दिल्लीत जवळपास १०७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
आयएमएने राज्यवार जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक दुसर्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. देशात मृत्यू झालेल्या डॉक्टरांपैकी या तीन राज्यातील आकडेवारी जवळपास ४५ टक्के आहे. गेल्या वर्षी कोविडचा प्रकोप सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात १३०० डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे.
आकडेवारी अशी
राज्य मृत्यू
आंध्र प्रदेश ३२
आसाम ०८
बिहार ९६
छत्तीसगड ०३
दिल्ली १०७
गुजरात ३१
गोवा ०२
हरियाणा ०३
जम्मू-कश्मीर ०३
झारखंड ३९
कर्नाटक ०८
केरळ ०५
मध्य प्रदेश १६
महाराष्ट्र १७
मणिपूर ०५
ओडिसा २२
पुद्दुचेरी ०१
पंजाब ०३
राजस्थान ४३
तामिलनाडू २१
तेलंगण ३२
त्रिपुरा ०२
उत्तर प्रदेश ६७
उत्तराखंड ०२
पश्चिम बंगाल २५
अज्ञात ०१
————————————-
एकूण ५९४