विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
चित्रपटाच्या क्षेत्रात सुंदर आणि आकर्षक चेहऱ्याला अतिशय ग्लॅमर असते. विशेषत : अभिनेत्रींच्या बाबत प्रेक्षकांमध्ये सुंदर चेहऱ्या विषयी अधिक क्रेझ असते, मात्र एखाद्या अभिनेत्रीचा चेहरा खराब झाला तर काय परिस्थिती ओढवेल. अलीकडे तमिळ अभिनेत्री रायझा विल्सनसोबतही असेच काहीसे घडले आहे.
अभिनेत्री रायजा तिच्या उपचारासाठी त्वचा चिकीत्सकाकडे गेली, पण असे काहीतरी घडले की, आता ती आता डॉक्टरांवर आरोप करीत आहे. वास्तविक तामिळ अभिनेत्री रायझा विल्सन एक साधा फेसियल घेण्यासाठी डॉक्टरकडे गेली. परंतु क्लिनिकमध्ये, डॉक्टरांनी त्याला इतर कोणत्या तरी उपचारांबद्दल सूचविले आणि तिला हे करण्यास भाग पाडले. त्यानंतर रायजावर जेव्हा ते उपचार झाले तेव्हा तिचा संपूर्ण चेहरा खराब झाला. आता रायझाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपला आक्षेप नोंदविला आहे.










