इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – डॉक्टर असो की वकील त्यांच्यासमोर खोटे बोलायचे नसते, असे म्हटले जाते. त्यामुळेच डॉक्टरांकडे गेल्यावर रुग्ण आपल्या आजाराची सर्व माहिती देतो. त्यावेळी काही रुग्णांना आपोआप आपल्या व्यथा वेदना मुळे अश्रू अनावर होतात आणि ते रडू लागतात ही बाब सर्वसामान्य समजली जाते. परंतु अमेरिकेमध्ये एका महिलेला डॉक्टर समोर रडल्यामुळे चक्क दंड ठोठावण्यात आला आहे. या अजब प्रकार यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून त्याची चर्चा सुरू आहे.
अमेरिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे रुग्णालयात पोहोचलेल्या एका महिलेला डॉक्टरांच्या भेटीदरम्यान रडल्याबद्दल 40 अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 3100 रुपये दंड ठोठावण्यात आला. कॅमिल जॉन्सन हे एक लोकप्रिय YouTuber आणि इंटरनेट व्यक्तिमत्व असून यांनी ट्विटरवर एक वैद्यकीय बिल शेअर केले आहे, ज्यामध्ये रडण्याच्या दंडाचा उल्लेख आहे. वैद्यकीय बिलामध्ये अनेक प्रकारचे शुल्क दाखविण्यात आले आहे, ज्यामध्ये भावनिक वर्तनाचा उल्लेख आहे, त्यासमोर 40 डॉलर दंडाचा उल्लेख आहे. जॉन्सनने ट्विट केले की, तिच्या बहिणीला दुर्मिळ आजार आहे आणि ती हताश आणि असहाय्य वाटल्याने ती भावूक झाली. कारण तिला काळजी होती.
जॉन्सनने सांगितले की, त्याच्या बहिणीशी कोणताही संवाद झाला नाही. त्याने कथितपणे दावा केला की वैद्यकीय सुविधेतील डॉक्टर, ज्याला नाव माहित नाही, तिने आपल्या बहिणीचे अश्रू पाहिले परंतु काहीही बोलले नाही. तसेच तिने पुढे स्पष्ट केले की, आरोग्य सेवा केंद्राने त्याच्या बहिणीचे नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांसाठी मूल्यांकन केले नाही. तज्ज्ञांनीही बहिणीशी बोलले नाही, कोणाचाही संदर्भ घेतला नाही किंवा तिला काही सांगण्यात आले नाही.
जॉन्सनने ट्विटरवर शेअर केलेले मेडिकल बिल या वर्षीच्या जानेवारीचे आहे. तिची तब्येत बिघडत असल्याबद्दल तिच्या बहिणीने डॉक्टरांची भेट घेतली होती. हिमोग्लोबिन चाचणीशिवाय इतर अनेक प्रकारच्या चाचण्यांचा खर्च वैद्यकीय बिलात दाखवण्यात आला आहे. त्यात रडण्यासाठी $40 डॉलर्स दंड आकारण्यात आला आहे.
जॉन्सन म्हणाली की, ती का रडत आहे हे न विचारता अश्रूंसाठी तिला हा दंड ठोठावण्यात आला. ना मदतीचा प्रयत्न झाला, ना कुठला उपाय, काहीही. ट्विटरवर शेअर केल्यापासून जॉन्सनच्या ट्विटला लाखो अधिक लाईक्स आणि हजारो टिप्पण्या मिळाल्या आहेत. अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी उच्च शुल्कासह वैद्यकीय बिलांबाबत त्यांचे अनुभव शेअर केले.