नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा रुग्ण उपचारासाठी आला की तो सर्वसामान्य माणूस असो वा गुन्हेगार असो डॉक्टर आपले कर्तव्य बजावतात. पण कधी कधी त्यांच्यावरच हल्ले होतात, शिविगाळ होते. पण तेव्हा माघार घेता येत नाही. कारण उपचाराला नकार देण्याची वेळ निघून गेलेली असते. मात्र आता नव्या नियमांनुसार डॉक्टरांना उपचाराला नकार देण्याचा अधिकार मिळणार आहे.
डॉक्टरांसोबत होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मारहाण, शिविगाळ, तोडफोड करणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना उपचारास नकार देण्याचे अधिकार डॉक्टरांना बहाल करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीस अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना हे अधिकार असणार आहेत. याशिवाय मोठ्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना देखील हे अधिकार असणार आहेत.
विशेषतः अशाच ठिकाणी तोडफोड, मारहाणीचे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे डॉक्टरांना अंदाज येताच ते उपचारासाठी नकार देऊ शकतात. याशिवाय दुसऱ्या पर्याय सूचविण्याचेही स्वातंत्र्या त्यांना आहे. रुग्णांनी असभ्य वर्तन केल्यास डॉक्टर त्याविरोधात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करू शकतात. त्यानुसार रुग्णाला उपचारासाठी इतरत्र पाठविण्याचा सल्लाही दिला जाईल. नवीन नियम मेडिक काऊन्सील ऑफ इंडियाच्या मेडिकल एथिक्स कोड २०२२ ची जागा घेतील, असे सांगितले गेले आहे.
भेटवस्तू घेता येणार नाही
डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांनी औषध कंपन्यांकडून मिळणाऱ्या सुविधा घेणे टाळावे, असेही या नियमात म्हटले आहे. प्रवासाचा खर्च, भेटवस्तू, सल्ला शुल्क, मनोरंजन सुविधा स्वीकारणे टाळावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
Doctor Medical treatment Rights Responsibility Commission
Duties Health