नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या. यानिमित्त पाठविलेल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना माझ्या शुभेच्छा. वैद्यकीय जगात, भारताने गाठलेले टप्पे अत्यंत कौतुकास्पद आहेत आणि भारताच्या डॉक्टर वर्गाने आपल्या ग्रहाला अधिकाधिक आरोग्यपूर्ण वातावरण देण्यात मोठे योगदान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी, ‘मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान मी ह्या गोष्टी बोललो होतो.”
https://twitter.com/narendramodi/status/1410439837044252673?s=20
लेखापाल दिनानिमित अशा दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लेखा परीक्षकांना आजच्या सनदी लेखापाल दिनानिमित शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्व लेखा परिक्षकांना आजच्या सनदी लेखापाल दिनाच्या शुभेच्छा ! भारताच्या प्रगतीमध्ये या व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. सर्व लेखा परीक्षकांनी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, जेणेकरुन भारतीय कंपन्या जगातील सर्वोत्तम कंपन्या ठरतील, असे आवाहन, पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा ट्वीटमध्ये केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1410439082543439874?s=20