सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चुकीचे उपाचार व रिपोर्ट न दिल्याच्या कारणावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा घटना रविवारी रात्री मनमाड शहरात घडली. शहरातील मध्यवस्तीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटल मध्ये घडला असून हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बिपीन गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले असून शहरातील डॉक्टरांनी पोलिस स्थानकात जाऊन घटनेचा निषेध केला व मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मारहाण कणाऱ्यांची धरकपड सत्र सुरू केले आहे. हॉस्पिटल मधील ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.