पुणे – सध्या जगभरात क्रिप्टोकरंसी चर्चेला आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. त्यावरून होणारी फसवणूक आपण बघतोय. लोक ऑनलाईन फसवणुकीचे बळी पडत आहेत. असेच काही अॅप लोकांना चुना लावत असल्यामुळे गुगलने अश्या ८ अॅपवर बंदी आणली आहे. हे सर्व अॅप क्रिप्टोकरन्सीच्या नावावर लोकांची फसवणूक करणारे अॅप आहेत.
एका सुरक्षा एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार, ८ धोकादायक अॅप जाहिराती दाखवून आणि जवळपास ११०० रुपये महिना सब्सस्क्रिप्शन शुल्क घेऊन युजरला चुना लावत आहेत. ट्रेंड मायक्रो या कंपनीने यासंदर्भात अध्ययन करून अहवाल तयार केला आहे. त्याची माहिती त्यांनी गुगल कंपनीला दिली. त्यानंतर हे आठ अॅप गुगलने प्ले स्टोअरवरून हटविले आहेत. अर्थात प्ले स्टोअरमधून हटविल्यानंतरही हे अॅप्स गुगलमध्ये काम करीत आहेत.
गुगलने बॅन केलेले ८ अॅप असे
BitFunds – Crypto Cloud Mining
Bitcoin Miner – Cloud Mining
Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
Bitcoin 2021
MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
Ethereum (ETH) – Pool Mining Cloud
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की 120पेक्षा जास्त बनावट क्रिप्टोकरन्सी अॅप अॉनलाईन उपलब्ध आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून जुलै 2020 ते जुलै 2021 या कालावधीत जगभरातील साडेचार हजार युजर्सला चुना लावण्यात आला आहे.