पुणे – एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाळगणार्यांना त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही अनुभवयास मिळतात. क्रेडिट कार्डची संख्या जास्त असल्यास त्याचे आर्थिक नुकसानही सोसावे लागले असेल. परंतु कार्ड घेणार्यांनी त्यावर सारखे लक्ष दिले नाही, तर ते कर्जाच्या मायाजालात तुम्ही फसू शकतात. अनेक क्रेडिट कार्ड असणार्या ग्राहकांनी त्याचा वापर योग्यरितीने केला पाहिजे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
योग्य कार्ड, वापर
गुंतवणूक सल्लागार सांगतात की, कोणीही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज नाही. व्यक्तीजवळ योग्य क्रेडिट कार्ड असावे आणि त्याचा योग्य वापर व्हावा. असे कार्ड निवडावे ज्यातून अधिक रिवॉर्ड पॉइंट किंवा कोणतीतरी ऑफर मिळेल.
नियंत्रण आवश्यक
क्रेडिट कार्डचा कमी वापर करावा हेच चांगले आहे. त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. युजरने एका वेळी ३०-४० टक्क्यांहून अधिक क्रेडिट मर्यादेचा वापर करू नये. एका युझरजवळ पाच वेगवेगळे कार्ड असू शकतात. त्यांचा २०-३० टक्के वापर केला तर उत्तम. पण कार्डचा वापर ८०-९० टक्क्यांपर्यंत केल्यास युजरला कर्जाची खूप गरज आहे हे दिसून येते. कार्डची संख्या किती आहे हा मुद्दा नसून, त्यांचा वापर किती करावा हा मुद्दा आहे.
वेळेवर पैसे भरणे गरजेचे
कोणाकडेही अनेक कार्ड असणे यात काही गैर नाही. पण या कार्डचे पैसे वेळेवर भरले नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. बिलाचे पैसे भरण्यासाठी प्रत्येक कार्डच्या निर्धारित तारखेला किंवा महिन्याचे रिमाइंडर ठेवून क्रेडिटकार्डच्या विलंब शुल्कापासून वाचले जाऊ शकते. युजर आपला खर्च आणि रिपेमेंटचे नियोजन करत असतील, तर पैशांची परतफेड करण्यासाठी त्यांना सक्षम असणे आवश्यक आहे.
जुने कार्ड तुमच्याकडेच ठेवा
सोळंकी सांगतात, क्रेडिट हिस्ट्री खूप मोठी असल्याने सर्वात जुन्या कार्डला युजरने स्वतःजवळच ठेवले पाहिजे.