मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या बँकिंग आणि अन्य क्षेत्रातील काही नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एनपीएस होय. त्याकरिता संबंधित कामे दि.15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केल्यास आपले कोणतेही नुकसान होणार नाही. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये खाते उघडायचे असेल तर लवकर निर्णय घ्या अन्यथा तुमच्या खिशाला अधिक भुर्दंड बसेल. कारण, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) आउटलेटवर ऑफर केलेल्या NPS संबंधित सेवांसाठी शुल्क वाढवले आहे. निर्गमन आणि पैसे काढण्याच्या प्रक्रियेवरील सेवा शुल्क बदलले आहे. निर्गमन आणि पैसे काढण्याची प्रक्रिया कमीत कमी 125 रुपये आणि कमाल शुल्क 500 रुपये करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे eNPS चे सेवा शुल्क योगदानाच्या 0.10 टक्क्यांवरून योगदानाच्या 0.20 टक्के करण्यात आले आहे. म्हणजेच किमान 15 रुपये आणि कमाल 10 हजार रुपये करण्यात आली आहे. सदर सुधारित शुल्क हे दि.15 फेब्रुवारी 2022 पासून लागू होईल. पीओपीकडे ग्राहकांसोबत शुल्काबाबत वाटाघाटी करण्याचा पर्याय असेल परंतु निश्चित किमान आणि कमाल शुल्काच्या रचनेमध्ये पेमेंट करावे लागेल. यापूर्वी 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. आता त्याची मर्यादा 200 रुपये ते कमाल 400 रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
सध्या, जर एखाद्या व्यक्तीने POP द्वारे NPS खात्यात रु 5,000 गुंतवले तर POP ने 12.50 रुपये आकारते, आणि किमान शुल्क 20 रुपये आता नवीन पीओपी फीसह, जर एखाद्या व्यक्तीने पीओपीमधून 5,000 रुपये एनपीएस खात्यात गुंतवले तर 25 रुपये आकारले जातील आणि किमान शुल्क 30 रुपये करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व अन्य आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क 20 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आले आहे. पर्सिस्टन्सी फीची मर्यादा वार्षिक 50 रुपये होती. पीओपीला प्रत्येक सदस्यासाठी पर्सिस्टन्सी फी मिळते. एक ग्राहक ज्याचे खाते त्याने उघडले आहे आणि जो एका आर्थिक वर्षात किमान 1000 रुपये योगदान देतो. तसेच आर्थिक वर्षात ग्राहक सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पीओपीशी जोडलेले असणे आवश्यक आहे.