मुंबई – पालकांचे आधार कार्ड असूनही मुलांचे नसल्यामुळे बरेचदा आर्थिक गुंतवणुकींना व विदेश दौऱ्यांना मर्यादा येतात. त्यामुळे मुलांचे आधार कार्ड अत्यंत आवश्यक झाले आहे. मुलांचे आधार कार्ड काढायचे असेल तर आई किंवा वडील यांच्यापैकी कुण्या एकाचे आधार कार्ड असले तरीही ते शक्य आहे. मात्र मुल ५ वर्षाचे झाल्यानंतर त्याच्या बायोमेट्रीक व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागते, अन्यथा आधार कार्ड व्हॅलीड उरत नाही.
बाल आधार कार्डची सुविधा केवळ ५ वर्षांपर्यंत आहे. त्यानंतरच्या वयोगटातील बालकांसाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. नजीकच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन तुम्ही बायोमेट्रिक करू शकता. पण त्यापूर्वी सरकारच्या appointments.uidai.gov.in/easearch.aspx या संकेतस्थळावर जाऊन बायमेट्रिक अपडेट करू शकता. त्यामुळे शाळेतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. मुलांचे वय १५ पेक्षा जास्त झाले की त्यांचे आधार कार्ड पुन्हा अपडेट करावे लागते. बायोमेट्रिक अपडेटसाठी कुठलेही शुल्क लागत नाही, हे विशेष.
घरबसल्या असे करा अप्लाय
१. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार कार्ड रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा
२. इथे मुलगा किंवा मुलीचे नाव, आई-वडिलांच्या नावासह इतर माहिती भरा.
३. आधार एनरॉलमेंट फॉर्मही भरा
४. पत्ता, लोकॅलिटी, जिल्हा, शहर, राज्य आदी माहिती भरा
५. अपॉईंटमेंट बटणवर क्लिक करून शेड्युल निवडा. यात सर्वांत जवळचे केंद्र निवडता येईल
६. केंद्रावर जाऊन मुलाचे बर्थ सर्टिफिकेट, आई-वडिलांचे आधार कार्डची कॉपी आणि रेफरन्स नंबर दाखवा
७. कागदपत्रे व्हेरिफाय झाल्यानंतर ही माहिती आधार कार्डशी लिंक केली जाईल.
८. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाचा केवळ फोटो रजिस्टर होईल
९. ६० दिवसांनी मेसेज येईल व ९० दिवसांनी आधार कार्ड घरी येईल