रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सकारात्मक प्रोत्साहन and Game change over: हा अनोखा प्रयोग आपल्या मुलांसोबत नक्की करुन पहा

by Gautam Sancheti
एप्रिल 25, 2022 | 5:28 am
in इतर
0
IMG 20220424 WA0020

 

सकारात्मक प्रोत्साहन and Game change over. एक अनोखा प्रयोग

जर आपण मुलांना सांगितलं ‘तुम्ही हराल’ तर ती हरतात. आपण त्यांना सांगितलं की ‘तुम्ही जिंकू शकता’ तर ती जिंकतात. नुकतंच मी हे प्रमाणासहित सिद्ध केलं.
शिक्षणक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडतं. इस्पॅलियर हेरिटेज स्कूलचा स्पोर्टस् डे होता. इयत्ता चौथी पाचवी एकत्रित विद्यार्थ्यांची ‘रस्सी खेच’ म्हणजेच ‘टग ऑफ वॉर’ दोन टीममध्ये चालू होतं. दोन्हीकडे पंधरा-पंधरा विद्यार्थी समान होते. एका टीमचं नाव होतं ‘प्रतापगड’ तर दुसऱ्याचं ‘सिंहगड’. खेळामध्ये तीन वेळा मॅच होणार होती. पहिल्या ‘टग ऑफ वॉर’मध्ये ‘प्रतापगड’ टीमचे विद्यार्थी हरले. मी हरलेल्या टीमला सांगितलं की, “तुम्ही डोळे बंद करून स्वत: कल्पना करा की तुम्ही हत्ती आहात. तुमच्यासारखी ताकद कोणाहीकडे नाही. तुम्ही इथे जिंकण्यासाठी आला आहात. ताकद मेंदूमध्ये आहे. तुमच्या मेंदूमधून बलशाही हत्तीची ताकद सळसळते.” एवढं visualise करून त्यांना मानसिक सूचना दिल्या ज्याला *psychology च्या भाषेत suggestion म्हणतात. जसं की You can do it.

sachin joshi
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक आणि संस्थापक, इस्पॅलियर स्कूल.
(ईमेल – [email protected])

लगेच 3 मिनिट मध्ये दुसरी मॅच सुरू झाली आणि आधी हरलेली टीम ‘प्रतापगड’ आता जिंकली.
-काय झालं असेल प्रतापगड टीम ला? विद्यार्थी तर तेच होते. शारीरिक ताकद देखील तेवढीच होती. मग आता कसे जिंकले??
समजावून घेऊ.
जेव्हा आपण मनाला विधायक-Positive Visualization करतो; सोबत प्रेरणा देतो तेव्हा आपलं mind त्या सूचना स्वीकारतं.* विद्यार्थ्यांना खरंच हत्ती झाल्यासारखं वाटलं आणि त्यांच्या अंगात हत्तीची ताकद सळसळली. खरं तर हे केवळ ताकदीचं फीलिंग होतं; म्हणून ते जिंकले. आपण मनाला जसं सांगतो तसं मन वागतं. कारण आपण जसा विचार करतो तसे घडतो.* म्हणून तर आपल्या मनातला self talk महत्त्वाचा असतो.

मग तुम्ही म्हणाल हे प्रत्येक वेळेस का होत नाही? आपण मनाला समजावतो तरी ते ऐकत का नाही?
याचं कारण, मन तेव्हा जास्त प्रभावी सूचना स्वीकारतं जेव्हा ते उच्च भावनिक पातळीवर असतं किंवा ते off conscious stage ला असतं. मॅचमध्ये हरल्याने ते भावनिक पातळीवर होतं. तिथे त्यांना योग्य visualization देऊन सूचना दिल्या; ज्या डायरेक्ट sub-conscious mind ला पोहोचल्या. सुप्त मन हे “काय खरं काय खोटं” हे तपासत नसून दिलेली सूचना अंमलात आणतं.

आता पुढे या प्रयोगात गंमत आणली. दुसरी मॅच ‘प्रतापगड’ टीम जिंकली. आता स्कोर 1-1 असा होता. मग मी ‘सिंहगड’ टीम हरल्यावर लगेच त्यांच्याशीही तेच बोललो. त्यांना पण डोळे बंद करून तसंच visualize करायला सांगितलं. सोबत प्रभावी सूचना दिली की “तुमच्या हातांमध्ये हत्तीचं बळ आलं आहे.” (इथे सूचना तुम्ही हत्ती आहात ही दिली नसून हातांमध्ये हत्तीचं बळ आलं आहे असं सांगितलं.) जी जास्त प्रॅक्टिकल होती. सोबत त्यांना भावनिक आव्हान केलं जे ‘प्रतापगड’ टीमला केलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं, “तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला गोल्ड मिळेल जे पाहून तुमचे आई-वडील आनंदी होतील.” सोबत त्यांना मोटिव्हेशन शॉर्ट स्पीच दिले. महत्त्वाच्या घोषणा दिल्या. “तुम्ही शिवाजीमहाराजांचे मावळे आहात. गड जिंकलाच पाहिजे.” हे सांगून तिसरी मॅच सुरू करायला सांगितली. आता तिसरी मॅच ‘सिंहगड’ टीम जिंकली. पहिल्यांदा जिंकलेली आणि दुसऱ्या वेळेस हरलेली ‘सिंहगड’ टीम आता तिसर्‍यांदा अतिशय कमी वेळात जिंकली.

काय कारण असेल? मानसिक पातळीवर काय घडलं असेल? *जेव्हा कल्पनाशक्ती सोबत एखादी ताकदवान आणि प्रभावी अशी भावना तथा willpower आपण जोडतो तेव्हा कल्पनाशक्ती आणि willpower ची बेरीज होत नाही तर गुणाकार होतो. ती सूचना अधिक प्रभावीपणे अंमलात येते.* हातांमध्ये हत्तीचं बळ ही कल्पना (visualization) गुणिले भावनिक आव्हान की आई-वडील आनंदी होतील. तसंच प्रेरणादायी वाक्य याने ती सूचना जास्त प्रभावीपणे अंमलात आली आणि ‘सिंहगड’ टीममधल्या पंधरा विद्यार्थ्यांची रस्सी ओढण्याची ताकद वाढली.

थोडक्यात काय, जेव्हा मुलांना आपण आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, वर्तणुकीतून, बॉडीलॅंग्वेजमधून समजावतो की ‘तू करू शकतोस’, सोबत कल्पनाशक्ती आणि प्रेरणा यांची त्याला भावनिक साथ असेल तर विद्यार्थी जिंकू शकतात. फक्त जिंकण्यासाठी लागणारं स्किल, कौशल्य आत्मसात केलेलं असायला हवं. विद्यार्थ्यांकडे कौशल्य असतं किंवा ते शिकू शकता पण पालकांच्या नकारात्मकतेमुळे त्यांची self image ‘मला जमणार नाही’ अशी बनते. मुलांची self image बनण्यात पालक आणि शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो.

आपण मुलांबाबत काय मत मांडतो त्यावर त्यांची संपूर्ण वर्तणूक ठरत असते. “आपण मुलांना जे समजतो त्याप्रमाणे ती स्वत:ला समजत असतात.” म्हणून मुलांना नकारात्मक लेबल लावू नका. मुलांना आपल्या वागण्यातून प्रेरणा मिळेल असं वागा. Visualization ची ताकद ओळखा. त्यासाठी मेडिटेशनचा वापर करा. ज्यांना मेडिटेशन ची सवय असते त्यांना mind Visualization चांगले जमते. आपल्या इस्पॅलियर च्या दोन्ही स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना हे मेडिटेशन अधून मधून मी नेहमी देत असतो.

माझ्या मेडिटेशनमध्ये डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि इतर व्यक्तिमत्त्व विकासाच्या सूचना रेकॉर्ड करून दिलेल्या आहे. तेच मेडिटेशन तुम्ही वापरा असं नाही. तुम्ही कुठलंही शास्त्रीय मेडिटेशन वापरू शकता. याने कल्पनाशक्ती विकसित होते. सांगायचा मुद्दा विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत राहा. हरणे जिंकणे चालूच असतं. मुख्य म्हणजे दोघांचा अनुभव विद्यार्थ्यांना हवा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी सांगितल्या गणितातील या रंजक गोष्टी; तुम्हाला माहित आहेत का?

Next Post

SBI ग्राहकांनो सावधान! हा फोन घ्याल तर तुमचे अकाऊंट होईल क्षणार्धात रिकामे…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

SBI ग्राहकांनो सावधान! हा फोन घ्याल तर तुमचे अकाऊंट होईल क्षणार्धात रिकामे...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011