विशेष प्रतिनिधी, नागपूर
स्मार्ट फोन ही तर आजच्या काळातील जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. पण मोबाइलमधील सगळ्याच गोष्टी, विशेषत: चॅट, फोटोज वगैरे दुसऱ्याला दिसू नये, त्याचा ऍक्सेस मिळू नये तसंच सिक्युरिटी म्हणून फोन आपण लॉक करून ठेवतो. यासाठी अर्थात पासवर्ड, पिन किंवा मग पॅटर्न ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. आपणही त्यातील एखादा पर्याय निवडतो. जोवर आपण हा पासवर्ड, पॅटर्न वगैरे लक्षात ठेवतो, तोवर सगळं सुरळीत असतं. पण, जेव्हा आपण तो विसरतो, तेव्हा मात्र परिस्थिती कठीण होते. फोन लॉक होत असल्याने आपण त्यात काहीही करू शकत नाही. मग सर्व्हिस सेंटरला जाण्याशिवाय कोणताच पर्याय आपल्या हाती उरत नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळात असं काही घडलं तर? घाम फुटला ना, पण नो नीड टू वरी. आम्ही अशा परिस्थितीत फोन सुरू करण्याच्या टिप्स तुमच्यासाठी आणल्या आहेत.
असा करा फोन अनलॉक
तुम्हाला जाे फोन अनलॉक करायचा आहे, तो आधी स्विच ऑफ करा. एक मिनिटभर थांबून मग आवाज कमी करतो ते बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबून धरा. यानंतर तुमचा फोन रिकव्हरी मोडवर जाईल. यातून फॅक्टरी रिसेटवर क्लिक करून डेटा काढून टाकण्यासाठी wipe cache हा पर्याय निवडा. पुन्हा मिनिटभर थांबून मग फोन सुरू करा. आता तुमचा फोन सुरू होईल, पण यातील तुमचे ऍप्स गेलेले असतील, सेटिंग्स बिघडलेले असतील.
तुमच्या फोनवर लॉक करण्यासाठी पॅटर्न ठेवला असेल, तर त्याचाही पर्याय आहे आमच्याकडे. तुमचा फोन घ्या आणि पाच वेळा चुकीचा पॅटर्न ड्रॉ करा. मग, ३० सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करा, असा एक मेसेज येईल. यात फरगॉट पासवर्ड असाही एक पर्याय असेल, यात तुम्ही जी मेलचा तोच मेल टाका, जो या बंद फोनमध्ये रजिस्टर असेल. यानंतर तुमचा फोन अनलॉक होईल. आणि तुम्ही पुन्हा नवीन पॅटर्न सेट करू शकाल. पण, जर तुमच्या लॉक झालेल्या फोनमधील इंटरनेट सुरू असेल, तरच ही ट्रिक वापरता येईल.