अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
फेब्रुवारी महिना संपण्यास आता केवळ ८ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची २ कामे पूर्ण करायची आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर तुम्हाला २८ फेब्रुवारीपर्यंत तुमचा पॅनकार्ड नंबर एलआयसीमध्ये लिंक करावा लागेल. त्याचबरोबर सरकारी पेन्शनधारकांना २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जाणून घेऊया सविस्तर
१. जीवन प्रमाणपत्र
जर तुम्ही निवृत्तीवेतनधारक असाल आणि तुम्हाला निवृत्ती वेतन चालू ठेवायचे असेल, तर तुमच्यासाठी २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत लाइफ सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य आहे. हे सर्टिफिकेट सादर केले नाही तर पेन्शन बंद होऊ शकते. पेन्शनधारकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते, पूर्वी हे सर्टिफिकेट सादर करण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ होती, जी ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढवण्यात आली होती. यानंतर ही तारीख २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही हे लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सबमिट करू शकता.
२. पॅन लिंक करणे
जर तुम्हाला LIC IPO मध्ये सहभागी व्हायचे असेल आणि तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला तुमची LIC पॉलिसी २८ फेब्रुवारी पर्यंत पॅनशी लिंक करावी लागेल. वास्तविक, पॉलिसीधारकांना एलआयसीच्या आयपीओसाठी राखीव श्रेणी मिळाली आहे. तुम्हाला रिझर्व्ह श्रेणी अंतर्गत IPO साठी अर्ज करायचा असल्यास, २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत परमनंट अकाउंट नंबर (PAN) अपडेट करणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्ही राखीव श्रेणी अंतर्गत IPO साठी अर्ज करू शकता