इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात प्रत्येक जण ताणतणावाच्या वातावरणात जगत आहे. आजचा दिवस कसा जाईल? आणि भविष्य आपल्या समाज कोणते संकट येईल? याची सर्वांना चिंता सतावत असते. त्यासाठी प्रत्येक पैशामागे धावत असतो. परंतु त्यासाठी प्रत्येक वस्तू पैसा मिळूनही मानसिक समाधान लाभत नाही. सहाजिकच ताणतणाव, नैराश्य आणि आरोग्य या संदर्भातील प्रश्न आणि समस्या कायम राहतात. त्यामुळे बहुतांश व्यक्ती या धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टीकडे वळतात. त्यातून मात्र अनेक जणांना मनशांती लाभते असे म्हटले जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मात अनेक धार्मिक कार्य सांगितलेले आहे या क्रमानुसार कार्य केल्यास निश्चितच यश, आरोग्य, संपत्ती आणि मनःशांती लाभते असे म्हटले जाते. शुक्रवार हा लक्ष्मीला समर्पित वार आहे. माँ लक्ष्मीच्या कृपेने सुखाचा मार्ग समृद्ध होतो, असे म्हणतात, वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांबद्दल जाणून घेऊ या…
माता लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभवाची देवी मानली जाते. मातेची शुद्ध मनाने पूजा केल्यास धन आणि वैभव प्राप्त होते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला धनाची दिशा म्हणतात. या दिशेच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. ही दिशा हिरव्या वनस्पतींनी सजवावी, असे केल्याने अडकलेले पैसे परत मिळणे सोपे होते. तसेच आर्थिक स्थिती मजबूत आहे. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी आणि कुबेर देवाच्या मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.
असे म्हटले जाते की, शुक्रवारी पांढरे कपडे घालावे, शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात मातेला कमळ अर्पण करून श्री सूक्ताचा पाठ करावे. माँ लक्ष्मीला पांढरी मिठाई अर्पण करावी. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तिच्या मंदिरात शंख, गाई, कमळ, लोणी, बत्तासे इत्यादी अर्पण करावे, शुक्रवारी कोणाची तरी मदत करा, असे करणे शुभ मानले जाते. शुक्रवारी घर किंवा दुकानाच्या तिजोरीत कमळाचे फूल ठेवा. ते फूल साधारण महिनाभर ठेवल्यानंतर त्या जागी नवीन फूल ठेवा. यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
(सूचना : या बातमी वजा लेखात दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धेवर आधारित आहे. ती केवळ सामान्य जनतेचे हित व भावना लक्षात घेऊन मांडण्यात आली आहे. यामागे कोणती अंधश्रद्धा किंवा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)