इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते तसेच आनंदी जीवन जगायचे असते. परंतु अनेकवेळा कष्ट करूनही त्या व्यक्तीला त्यानुसार प्रगती करता येत नाही. अनेकवेळा तो भरपूर कमावतो पण बचतीच्या नावावर त्याच्याकडे काहीच शिल्लक नसते. अशा परिस्थितीत व्यक्ती निराशेच्या दिशेने जाते. परंतु काहीजण राशिभविष्यावर किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे घडतेही असे त्यांना वाटते.
ज्योतिषशास्त्रात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. या सोप्या आणि अचूक उपायांचा अवलंब केल्याने व्यक्ती पैशाच्या तंगीपासून मुक्त होऊ शकते. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या घरात सुख-शांती राहते. ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर कोणते काम करावे, देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते हे जाणून घेऊ या…
सर्वप्रथम हे करा
सकाळी उठल्याबरोबर सर्व प्रथम आपल्या तळहाताकडे पाहून परमेश्वराचे स्मरण करा आणि ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमधे सरस्वती करमोले स्तितो ब्रह्म प्रबते कर्दर्शनम् । ‘ या मंत्राचा जप करा, असे मानले जाते की, ब्रह्मासोबत सरस्वतीचा वास माणसाच्या हातात असतो. असे केल्याने दिवस चांगला जाईल आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील. तसेच सकाळी उठण्यापूर्वी, अंथरुणावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी, पृथ्वी मातेच्या चरणांना नक्कीच स्पर्श करा. शास्त्रानुसार माता पृथ्वी देखील मातेसारखी आहे.
लवकर उठा
शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी उठणे शुभ मानले जाते. स्नानासोबतच तांब्याच्या भांड्यात सूर्याला जल अर्पण करावे. कारण भगवान सूर्याबद्दल सर्वांना आदर आहे. हा ग्रह नोकरी, व्यवसाय, सत्तेचा कारक मानला जातो. त्यामुळे रोज अर्घ्य अर्पण केल्याने सूर्य ग्रह बलवान होतो, त्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते.
तुळशीचे महत्त्व
शास्त्रात तुळशीचे महत्त्व खूप सांगितले आहे. तुळशीमध्ये लक्ष्मी वास करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाची पूजा रोज करावी. यासोबतच तुळशीच्या रोपाची थोडीशी माती घेऊन रोज तिलक लावावेत आणि प्रत्येक कार्य सिद्धी होईल.
रोज पठण
लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्राचे रोज पठण करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, यामुळे घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे त्या व्यक्तीवर भगवंताची कृपा सदैव राहते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. असे मानले जाते की, दररोज शिवलिंगात दुधासह जलाभिषेक किंवा अभिषेक करावा. याचा व्यक्तीला नक्कीच फायदा होतो.