नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिले पाहिजे असेही म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी याअगोदही केंद्र सरकारवर कोरोना संदर्भात टीका केली होती. सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले. ही टीका करतांना त्यांनी सरकारला अनेकदा इशारे व सुचनाही केल्या. काही सुचना सरकारने मान्य केल्या. तर काही सुचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी ट्विट करुन देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सोमवारी लसीकरण धीम्यागतीने होत असल्याबद्दलही टीका केली होती.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी लाॅकाडाऊनच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. लॉकडाऊनमुळे व्हायरसला हरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
https://twitter.com/RahulGandhi/status/1389438109176274944?s=20