नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या सुट्यांमध्ये नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महामार्ग बसस्थानकाच्या भागात महिलेच्या पर्समधील दागिने लांबवण्यात आले तर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल लांबवण्यात आला आहे हा गुन्हा सुद्धा मुंबई नाका परिसरात घडली आहे.
बसमध्ये चढताना चोरी
बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी महिलेची पर्स उघडून मंगळसुत्र आणि ब्रॅसलेट असा सुमारे ५६ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना महामार्ग बसस्थानक भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना अनिल सोनार (४४ रा.कासार गल्ली,भडगाव जि.जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनार या नाशिक येथे आल्या होत्या. रविवारी (दि.३०) दुपारी त्या कसारा येथे जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. कसारा बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील पर्सची चैन उघडून आतील कप्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र आणि चांदीचे ब्रॅसलेट असा सुमारे ५६ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.
मोबाईल लांबवला
रस्त्याने पायी जाणाºया व्यक्तीच्या खिशातील मोबाईल दुचाकीस्वारांनी बळजबरीने काढून पोबारा केल्याची घटना संदिप हॉटेल भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल बन्सिलाल वैद्य (५९ रा.वनवैभव कॉलनी,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. वैद्य गेल्या गुरूवारी (दि.२७) मुंबईनाक्याकडून चांडक सर्कलच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. संदिप हॉटेल कडून एमएच १५ एचजे ५१७३ या मोपेडवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल बळजबरीने काढून चांडक सर्कलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
Diwali Vacation Nashik City Crime Women