मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या कालावधीमध्ये (म्हणजे १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळात) प्रवास करण्यासाठी विमानांच्या उपलब्ध वेळा शोधण्यासाठी केल्या गेलेल्या फ्लाइट सर्चच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे जागतिक स्तरावरील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायक (KAYAK) ला आढळून आले. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास पुन्हा एकदा निश्चितपणे आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या कार्यसूचीमध्ये दाखल झाला आहे आणि यंदाच्या दिवाळीमध्ये आपण प्रवास करू असे सकारात्मक संकेत प्रवाशांनी दिले आहेत. २०१९ साली याच कालावधीमध्ये केल्या गेलेल्या सर्चशी तुलना करता यावर्षी डोमेस्टिक फ्लाइट्स सर्चमध्ये सुमारे १२४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट सर्चमध्ये सुमारे १३३ टक्के वाढ झाल्याचे आणि रिटर्न इकॉनॉमी वर्गाच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये २०१९ च्या तुलनेत ४० टक्के वाढ झाल्याचे या आकडेवारीतून दिसून आले आहे.
कायक इंडियाचे कंट्री मॅनेजर, तरुण ताहिलियानी यांनी सांगितले, “विमानप्रवास महागला तरीही त्यामुळे येत्या दिवाळीच्या कालावधीमध्ये देशांतर्गत आणि परदेशांतील ठिकाणांना भेटी देण्याचा भारतीय प्रवाशांचा उत्साह जराही मावळला नसल्याचे कायकच्या सर्च डेटामधून उघड झाले आहे.” देशांतर्गत प्रवासासाठी केल्या गेलेल्या सर्चमधून हाती आलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या कालावधीमधील २१ ऑक्टोबर या दिवशी भारतीय विमानतळे सर्वाधिक गजबजलेली असणार आहेत, तेव्हा विनासायास आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी या तारखेच्या थोडे आधी किंवा मग नंतर प्रवासाला निघणे चांगले. प्रवाशांची संख्या सर्वाधिक असलेले दिवस टाळल्याने सर्वाधिक वाजवी दरात विमानप्रवास करता येईल आणि खरेतर सुटीतील प्रवास स्वस्त दरात करता यावा यासाठी आपण निवडलेल्या गंतव्यस्थानासाठी तुम्ही प्राइज अलर्ट सेट करा अशी आमची शिफारस आहे.”
दिवाळीतील देशांतर्गत प्रवासाची आकडेवारी
वर्ष २०१९ मधील याच कालावधीमधील सुटीच्या तारखांशी तुलना केली असता यावर्षीच्या सुटीच्या कालावधीमध्ये डोमेस्टिक फ्लाइट्ससाठी झालेल्या सर्चमध्ये सुमारे १२४ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या सुटीच्या कालावधीमध्ये रिटर्न डोमेस्टिक फ्लाइटची सरासरी किंमत ही सुमारे १४,७१९ ₹ इतकी असून २०१९ मधील याच कालावधीच्या तुलनेत या किंमतीत सुमारे ३९ टक्के वाढ झाली आहे.
या कालावधीमध्ये भारतीय विमानतळांवरून रिटर्न इकॉनॉमी डोमेस्टिक फ्लाइट्ससाठी सर्वाधिक सर्च या २१ ऑक्टोबर या दिवसासाठी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये २१ ऑक्टोबर हा दिवस भारतातील विमानतळांसाठी सर्वाधिक वर्दळीचा असू शकतो तर सर्वात कमी शोध हा ऑक्टोबर १९ या तारखेसाठी घेतला गेला आहे.
२२ ऑक्टोबर हा या सुटीच्या कालावधीमध्ये रिटर्न इकॉनॉमी डोमेस्टिक फ्लाइटने विमानप्रवास करण्यासाठीचा सर्वात महागडा दिवस असणार आहे तर १९ ऑक्टोबर हा सर्वात स्वस्त दिवस असणार आहे.
येत्या दिवाळीच्या दिवसांत रिटर्न डोमेस्टिक इकॉनॉमी फ्लाइट्ससाठी सर्वाधिक प्रमाणात शोधली गेलेली १० गंतव्य स्थानांमध्ये नवी दिल्ली, गोवा, म्हैसूर, मुंबई, पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार बेटे), बेंगळुरू, श्रीनगर, कोलकाता, पटणा, कोची यांचा समावेश आहे.
दिवाळीतील आंतरराष्ट्रीय प्रवासाची आकडेवारी
दिवाळीच्या सुटीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी झालेल्या फ्लाइट्सच्या सर्चमध्ये पॅनडेमिकपूर्व काळातील याच दिवसांच्या तुलनेत १३३ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये रिटर्न इकॉनॉमी इंटरनॅशनल फ्लाइटच्या किंमतींमध्ये सुमारे ४० टक्के वाढ होऊन ती सुमारे ६७५४३ ₹ पर्यंत पोहोचूनही सर्चमध्ये ही वाढ नोंदवली गेली आहे.
भारतीय प्रवाशांसाठी परदेशात एखाद्या ३-४ स्टार हॉटेल रूममध्ये एका रात्रीच्या वास्तव्यासाठी भरावे लागणारे डबल रूमचे भाडे सरासरी १६,४३४ ₹इतके आहे. पॅनडेमिकपूर्व काळाच्या तुलनेत या किंमतीत सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे व त्यासाठीच्या सर्चमध्ये सुमारे ३२ टक्के घट झाली आहे.
दिवाळीच्या दिवसांत रिटर्न इंटरनॅशनल इकॉनॉमी फ्लाइट्ससाठी सर्वाधिक प्रमाणात शोधली गेलेल्या दहा गंतव्यस्थानांमध्ये दुबई-यूएई, बँगकॉक- थायलंड, सिंगापूर, न्यू यॉर्क-युनायटेड स्टेट्स, बाली-इंडोनेशिया, माले-मालदीव्ह्ज, लंडन-युनायडेट किंगडम, इस्तंबूल-टर्की, हो चि मिन्ह सिटी-व्हिएतनाम, मेलबर्न-ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.
सर्व किंमती आणि सर्च डेटा हा १९.१०.२०२२ ते २४.१०.२०२२ या कालावधीत करावयाच्या प्रवासासाठी करण्यात आलेल्या सर्चवर (०१.०६.२०२२ आणि ०६.१०.२०२२ दरम्यान) आधारित आहे. या आकडेवारीची तुलना २२.१०.२०१९ ते २७.१०.२०१९ या कालावधीत झालेल्या सर्चशी (०४.०६.२०१९ आणि ०९.१०.२०१९ दरम्यान) करण्यात आली आहे.
Diwali Vacation Indians Tourism Booking