शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 25, 2022 | 5:00 am
in इतर
0
diwali e1666607266441

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष –
जगभर अशी साजरी होते दिवाळी!

देशभर आनंदाचे,उत्साहाचे मंगल तोरण उभारणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते. म्हणजेच, जगभर आता दिवाळीचा सण साजरा होऊ लागला आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

अलीकडे सगळे जगच एक ग्लोबल व्हिलेज झालेले असल्याने प्रत्येक देशातच विविध देशांतील लोक कामधंदा आणि शिक्षण यानिमित्ताने जातात. कालांतराने स्थायिकही होतात. भारतीय लोक त्याला अपवाद नाहीत. लोकांसमवेत त्यांची संस्कृती, भाषा आणि सण हे सगळे आलेच. त्यामुळे आता जगभर पसरलेल्या भारतियांनी दिवाळी अथवा दीपावली हा सणही जगभर नेला आहे. त्यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्टान्ने, फराळाचे पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेंदी, दिव्यांची, इतर आरास आणि शोभेचे दारूकाम असतेच. भारताशेजारच्या, तसेच पुढारलेल्या काही देशांत दिवाळी कशी साजरी करतात ते जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ‘नेपाळची दिवाळी’!
भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी सण ‘तिहार’ म्हणून साजरा केला जातो. यातील पहिला दिवस काग तिहार म्हणजे कावळ्यांचा दिवस! कावळ्यांसाठी गोडधोड पदार्थ घराच्या छपरावर ठेवून दिले जातात. कावळ्यांचे ओरडणे हे दु:ख आणि मृत्यूचे प्रतीक असल्याने सणापूर्वी ते दूर करण्यासाठी हा नैवेद्य ! हिंदु संस्कृतीत पितृपक्षात ज्याप्रमाणे कावळ्याला पिंडदान केले जाते, त्याच आधारावर ही पद्धत चालू झाली असावी, असे वाटते !
दुसर्‍या दिवशी चक्क कुत्र्यांची पूजा होते. त्याला कुकुर तिहार म्हणतात. माणसाच्या कुत्र्याशी असलेल्या अतूट नात्याचा आदर करणे ही त्यामागची भूमिका. या दिवशी कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून, गळ्यात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड दिले जाते. नंतर गाय तिहार म्हणजे गायीची पूजा !सर्वांत शेवटी लक्ष्मीपूजनकेले जाते.

दिव्यांची रोषणाई करणारी – ‘इंडोनेशियन दिवाळी’!
इंडोनेशियामध्ये म्हणजे मुख्यत: बाली बेटांमध्ये देवळांना दिव्यांची रोषणाई उत्तम तर्‍हेने केली जाते. शिवाय दिवाळी धमाका म्हणून नृत्य आणि विविध प्रकारच्या वेशभूषा स्पर्धा यांचेही समारंभ जागोजागी साजरे होतात.
दिव्यांचा लखलखाट करणारी ‘सिंगापूरची दिवाळी’
सिंगापूरमध्ये अनेक भारतीय स्थायिक झालेले आहेत. तिथे दिवाळी आपल्यासारखीच दणक्यात साजरी होते. सुरक्षा आणि ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी मात्र तिथे सार्वजनिक आतषबाजीला कटाक्षाने बंदी आहे. येथील दिव्यांच्या आरासमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे आकर्षक रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते.

रामायण – महाभारताचे दर्शन घडविणारी ‘मलेशियन दिवाळी’!
मलेशियामध्ये दिवाळीत शॅडो पपेट म्हणजेच सावल्यांचा खेळ मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. रामायण आणि महाभारत यांतील कथा बाहुल्यांच्या खेळाद्वारे दाखवण्याचे हे कलाकृतीपूर्ण काम असून, या आकृत्या म्हशीच्या कातड्यापासून बनवल्या जातात. त्यांना रंग देऊन, सर्व प्रकारची आभूषणे, वस्त्रे आणि मुकुट घालून त्यांचे नृत्य दाखवले जाते.
नदीत दीपदान करणारी ‘थायलंडची दिवाळी’!
थायलंडमध्ये दिवाळी लुई क्रॅथोंग म्हणून साजरी केली जाते. दीपावली म्हणून सिद्ध केलेले दिवे मात्र केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवले जातात. असे सहस्रो दिवे नदीमध्ये सोडलेले असतात. हा दीपोत्सव अत्यंत नयनरम्य असतो.

रोषणाईची स्पर्धा आयोजित करणारी ‘फिजी दिवाळी’!
फिजी या पॅसिफिक बेटात निळीच्या उद्योगासाठी अनेक वर्षांपूर्वी गेलेले भारतीय मजूर कायमचे तिथे स्थायिक झाले आहेत. सध्या फिजीमधील ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे असून, तिथे पारंपरिक पद्धतीने अतिशय जोरदारपणे दिवाळी साजरी होते. नादी या शहरामध्ये सिगाटोका, लाउटोका आणि डेनाराऊ या आसपासच्या गावांतून आणि खेडेगावांतून विशेषतः दिवाळीसाठी विशेष बसगाड्या सोडल्या जातात. या शहरातील एक आगळीवेगळी परंपरा म्हणजे दिव्यांच्या रोषणाईच्या स्पर्धा. फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला प्रारंभ होतो.

फराळाचे पदार्थ बनवून साजरी होणारी ‘अमेरिकन दिवाळी’!
दिवाळीचा सण अमेरिकेतही आनंदाची बरसात करतो. तेथील सहस्रो भारतीय लोक त्यांच्या घरी दिवाळी साजरी करतातच; पण आता भारतीय शहरांच्या धर्तीवर अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त विशेष मिठाई बनवल्या आणि विकल्या जातात. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांत स्थायिक झालेल्या अनेक गुजराती स्त्रियांनीही हा गृहोद्योग चालू केला आहे. चकल्या, लाडू, शंकरपाळे यांसारख्या पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी त्या आधी महिनाभर कार्यरत असतात.
जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असतांना वर्ष २००३ पासून त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रघात चालू केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वर्ष २००९ मध्ये स्वत:च्या अध्यक्षीय घरात पूर्वेकडील खोलीमध्ये वैदिक मंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरी होणारी ‘इंग्लडची दिवाळी’!
संयुक्त राष्ट्रांतही (युनायटेड किंगडम म्हणजे यूकेतही) भारतीय घरांमध्ये दिवाळी आगळीवेगळी असते. प्रत्येक भारतीय धूमधडाक्यात दिवाळी साजरी करतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या येथील विद्यापिठांतही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिवाळी सेलिब्रेशन करतात. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या वतीने तर दिवाळीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला ४०० ते ५०० लोकांची उपस्थिती सहज असते. याव्यतिरिक्त लंडन शहरातून दिवाळीनिमित्त एक मोठी मिरवणूक निघते. त्यात अनेक भारतीय आणि विदेशी लोक सहभागी होतात. मिरवणुकीमध्ये भारतीय वाद्ये, नाच आणि कपडे यांचे मनोहारी दर्शन होते. आयुर्वेदिक मसाज ज्याला आपल्याकडे अभ्यंगस्नानम्हणतात, मेंदी, साडी नेसणे आणि नेसविणे या सार्‍या पारंपरिक गोष्टी हौसेने केल्या जातात. विदेशी नागरिकही या समारंभांत आनंदाने सहभागी होतात.

दोन आठवडे चालणारी ‘न्यूझीलंडची दिवाळी’!
न्यूझीलंडमध्ये सिटी काउन्सिलची (म्हणजे आपल्याकडची म्युनिसिपालिटी) तर्‍हा आणखीच वेगळी. ऑकलंड शहर आणि वेलिंग्टन या न्यूझीलंडच्या राजधानीच्या शहरात प्रत्यक्ष दिवाळीच्या आधी दोन आठवडे दिवाली मेला साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले जाते. बी हाइव्ह या पार्लमेंटच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भारतीय नृत्ये, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, रांगोळीच्या कार्यशाळा आदिंचा त्यात समावेष असतो.

‘हरेकृष्ण आणि स्वामीनारायण मंदिरांतील दिवाळी’!
देशोदेशी पसरलेल्या हरेकृष्ण मंदिरांतून आणि स्वामीनारायण मंदिरांमधूनही दिवाळी साजरी केली जाते. विशेषत: हरेकृष्ण मंदिरांतील शेंडी ठेवलेले, धोतर नेसून हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे करत नाचणारे आणि घंटोन्घंटे हार्मोनियमवर हा जप वाजविणारे विदेशी भक्त दिवाळीची वाट पहात असतात.
न्यूझीलंडमधील भारतीय मंदिरांतून दिवाळीनिमित्त अन्नकूट म्हणजे अन्नकोटाचे आयोजन होते. भक्तमंडळी शेकडो प्रकारचे पदार्थ बनवून ते आकर्षकरित्या मांडून ठेवतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारे चोपडीपूजन हे या मंदिरांमधून, तसेच विविध भारतीय दुकानांमध्ये केले जाते. अनेक भारतीय दुकाने या दिवशी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना हिशेबाच्या वह्यांचे पूजन करण्यासाठी बोलावून मिठाई आणि बोनस वाटतात. अशा प्रकारे आनंद,उत्साह आणि चैतन्य देणारी भारतीय दिवाळी आता अशी जगभर साजरी केली जाते.

(संदर्भ – विकिपीडिया, काही वेबसाईटस व पुस्तके)
Diwali Special Celebration in Various Countries by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा अमावस्येचा दिवस; जाणून घ्या, मंगळवार, २५ ऑक्टोबरचे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – दुःख आले तर हे करा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - दुःख आले तर हे करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011