शेगाव – दिवाळीच्या सणात श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. यंदाही भाविकांचा मोठा ओघ राहणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा दर्शनासाठी येण्यापूर्वी काही बाबी सर्वांना जाणून घेणे आवश्यक आहे. विविध नियमांचे पालन तसेच, ऑनलाईन पास सक्तीचा करण्यात आला आहे.
राज्यभरातील धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत. कोरोना संसर्गामुळे धार्मिक स्थळे बंद होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने धार्मिक स्थळे सुरू आहेत. मात्र, कोरोनाशी निगडीत विविध नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे. येथील गजानन महाराज संस्थाननेही त्यासंदर्भात सर्व ती तयारी केली आहे. दिवाळीत भाविकांचा ओघ लक्षात घेऊन सर्व उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. ज्या भाविकांकडे ई पास असेल त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. ई पास देण्याची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. एका दिवसात केवळ ९ हजार भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्याचे संस्थानने निश्चित केले आहे. तसेच, १० वर्षाच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील भाविक यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या नियमांचे कसोशीने पालन करावे लागले. ज्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना मंदिर प्रवेशासाठी प्राधान्य असणार आहे. दर्शनासाठी आवश्यक ई पास खालील वेबसाईटवर मिळू शकणार आहे.
https://www.gajananmaharaj.org/