बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आज आहे दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा; असा आहे मुहूर्त

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2021 | 5:09 am
in मुख्य बातमी
0
diwali

पंडित दिनेश पंत

यंदा दीपावली मध्ये पाडवा आणि बलिप्रतिपदा एकाच दिवशी आलेले आहेत.

दिवाळी पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी नूतन वास्तू, सुवर्ण खरेदी, नवीन प्रकल्पाला सुरूवात, रत्न खरेदी, नवीन संकल्प यास विशेष महत्त्व असते. दीपावली पाडव्या दिवशी सायंकाळी पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते तर काही कुटुंबात घरातील ज्येष्ठ पुरुषांना घरातील महिला वर्गातर्फे औक्षण केले जाते.

बलिप्रतिपदा 
विष्णूच्या वामन अवतारात दानशूर राजा बलि यास जेव्हा वर मागण्यास सांगण्यात आले, त्यावेळी पृथ्वीवर माझ्या राज्याच्या आठवणी प्रित्यर्थ तीन दिवस सण साजरा करावा, अशी अपेक्षा राजा बळी यांनी व्यक्त केली. त्यास तथास्तु म्हणत वामनावतार विष्णूने कार्तिक अमावस्या लक्ष्मीपूजन, कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा व कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हे ते तीन दिवस उत्सव साजरा करण्यास सांगितलं. अशी पौराणिक अख्यायिका सांगितली जाते.
अनेक कुटुंबांमध्ये याप्रसंगी राजा बली पूजन केले जाते. यामध्ये बळीची प्रतिमा काढून त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो व आरती केली जाते.

राजाबली पूजा तथा औक्षण साहित्य
बळीची प्रतिमा, आंब्याची पाने, हार, फुले, हळद, कुंकू, अक्षता, मंगल कलश, फळे, नंदादीप, निरांजन, फुलवात, कापूर, कणिक दिवा, नूतन वस्त्र. षोडशोपचारे पूजा, आरती व महानैवेद्य झाल्यानंतर औक्षण करावे.

दीपावली पाडवा म्हणजे पती-पत्नीने एकमेकांचा सन्मान करायचा दिवस. याला बलिप्रतिपदा असे म्हणतात. महान दानशूर राजा बली याला भगवान विष्णूने दिलेल्या आशिर्वादामुळे वामन रुप मिळाले. तोच हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो.
बलिप्रतिपदा-दीपावली पाडवा या दिवसापासून व्यापारी नवीन वर्ष सुरुवात करतात. नवीन चोपडी जमा-खर्च लेखनाचा प्रारंभ या दिवशी पासून केला जातो. या दिवशी सायंकाळी धान्यावर बळीराजाची प्रतिमा काढून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींना माता-भगिनींकडून औक्षण केले जाते.
भारतीय संस्कृतीत जे काही मोजके शुभमूहूर्त आहेत त्यातीलच एक म्हणजे दिवाळी पाडवा. या दिवशी वस्तू किंवा अन्य काही खरेदीसाठी कुठलाही मुहूर्त बघावा लागत नाही. तसेच, यादिवशी घेतलेली वस्तू ही शुभ समजली जाते. त्यामुळेच वाहन, दागिने यासह विविध वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

मुहूर्त

दिवाळी पाडवा या दिवशी औक्षण करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
राजा बलि पूजा तसेच औक्षण मुहूर्त सायंकाळी ०६:३२ ते रात्री ८.३२ वाजता

सर्व वाचकांना दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा….

IMG 20201113 WA0017

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल दिवाळी पाडव्याचा दिवस; वाचा, आजचे राशिभविष्य

Next Post

एअरटेलचे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे आहेत ५ प्लॅन्स

India Darpan

Next Post
airtel

एअरटेलचे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे आहेत ५ प्लॅन्स

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011