नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या शहरात सुरू आहे. वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाण शहरात अत्यल्प आहे. तसेच, पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविली आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाला वेग दिला जात आहे. मात्र, सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा (४ व ५ नोव्हेंबर) या दोन्ही दिवशी शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही दिवाळीत लस घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला महापालिका केंद्रांमध्ये लस उपलब्ध राहणार नाही. पुढील दोन दिवस तुम्हाला खासगी केंद्रांचाच पर्याय उपलब्ध असेल.
https://twitter.com/my_nmc/status/1455805475518246926