नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या खरेदीमुळे शहराच्या विविध भागात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच गावाकडे गाणारे आणि गावाकडून परत येणारे नागरिक यांचीही भर त्यात पडली आहे. परिणामी, शहराच्या विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी पहायला मिळत आहे. नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई महामार्ग, नाशिक-औरंगाबाद महामार्ग, दिंडोरी रोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसत आहे. त्याशिवाय शहरातील बाह्य आणि अंतर्गत रिंग रोडही वाहनांनी फुलले आहेत. परिणामी, अनेक रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
बघा, सातपूरच्या अशोकनगर परिसरातील वाहतूक कोंडीचा हा व्हिडिओ
Diwali Nashik City All Roads Traffic Jam