मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये दुपारच्या सुमारास हातात पिस्तुल घेऊन एक व्यक्ती घरात शिरल्याने खळबळ उडाली. जैन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या निलेश दोषी यांच्या घरात हा चोर बंदूक घेऊन घुसला आणि त्याने घरातील तीन महिलांना गन पॉइंटवर ठेवले. त्यामुळे घरातील महिला प्रचंड घाबरल्या. त्याचवेळी शेजारील व्यक्तीने अग्निशामक पथकाला याची माहिती दिली आणि ते व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. याचवेळी पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमला. अखेर या चोराला पकडण्यात यश आले. ऐन दिवाळीच्या दिवशी मालेगावमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याव्यक्ती कडे असलेली बंदूक मात्र नकली असल्याचे अखेरीस उघडीस आले.
Diwali Malegaon Minister Dada Bhuse Theft Catch Video