गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धनत्रयोदशी उद्याच! असा आहे मुहुर्त आणि महत्व

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2022 | 5:29 pm
in इतर
0
dhantrayodashi

 

– पंडित दिनेश पंत
चेतन्याचे पर्व असलेल्या दिवाशीच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. अतिशय चैतन्यमयी आणि मंगल अशा या उत्सवाची जणू वर्षभर वाट पाहिली जाते. यंदाच्या दिवाळीचे मुहुर्त, महत्त्व आणि विशेष आपण आता जाणून घेऊया…

२२ ऑक्टोबर – शनिवार – धनत्रयोदशी
२अश्विन वद्य तृतीया हा दिवाळीचा दुसरा दिवस. म्हणजे धनत्रयोदशी. याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. भगवान धन्वंतरी पूजन केले जाते. यमदीपदान म्हणजे सायंकाळी कणकेचा दिवा करून त्याची वात दक्षिण दिशेकडे ठेवून तो प्रज्वलित करणे. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.
या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा केली जाते. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा केली जाते. मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावला जातो. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी केली जाते. कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावला जातो.

२४ ऑक्टोबर – सोमवार – नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन
अश्विन वद्य चतुर्दशी हा दिवळीचा तिसरा दिवस. या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. कुबेर पूजन, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन या दिवशी केले जाते. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ६.४ मिनिटांपासून रात्री ८.३४ मिनिटापर्यंत आहे….
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासूर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की, नरकासूर नावाचा असूर मानवांना पीडा देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्‍याला नरकाची पीडा होऊ नये. या दिवशी अभ्यंगस्नान करतात.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

२६ ऑक्टोबर – बुधवार – बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा व भाऊबीज
दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे. यंदा  यमद्वितीया, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि दिवाळी पाडवा हे एकाच दिवशी साजरे होत आहेत. बली प्रतिपदा अर्थात दिवाळीतला पाडवा या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करावे. भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाचे औक्षण करावे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस होय…
सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Festival Dhantrayodashi Tomorrow Importance Muhurta

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मोठी दिवाळी भेट जुनी पेन्शन योजना लागू होणार

Next Post

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ १० दिवस बंद; देशभरात कांद्याच्या पुरवठ्यावर होणार परिणाम

India Darpan

Next Post
lasalgaon

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ १० दिवस बंद; देशभरात कांद्याच्या पुरवठ्यावर होणार परिणाम

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011