सूरत (गुजरात) – दिवाळी बोनस हा कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंददायी बाब असते. कारण, या बोनसच्या माध्यमातूनच कर्मचारी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करीत असतात. कुटुंबातील सदस्यांसाठी विविध वस्तूंची खरेदी असो की अन्य बाबींसाठी हाच बोनस उपयुक्त ठरत असतो. हाच बोनस जर अत्यंत सुखद असेल तर. येथील एका कंपनीने अशीच काहीशी बाब केली आहे. त्यामुळेच ती देशभरात चर्चेची ठरत आहे. कंपनीने आपल्यया सर्व कर्मचाऱ्यांना थेट इलेक्ट्रिक स्कूटरच भेट दिली आहे. ही स्कूटर म्हणजेच दिवाळी बोनस अर्थात गिफ्ट आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर खुपच वाढले आहेत. कर्मचारी महागडे इंधन खर्चून कंपनीत येतात. शिवाय यामुळे प्रदूषणही होते. याची दखल घेत या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना बोनसच्या रुपात स्कूटर दिल्याचे कंपनीचे संचालक सुभाष दावर यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1456245765945249795