नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नावे बनावट व्हॉटसअॅप अकाऊंट तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आयुक्त गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॉटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन श्री. राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. यासंदर्भात आयुक्त गमे म्हणाले की, “कुणीतरी माझ्या नावाने 9340233468 हा मोबाईल क्रमांक वापरत आहे. त्यावर माझा डीपी दिसत आहे. काही संदेश आला तर त्याला प्रतिसाद देवू नये.”, असे गमे यांनी सांगितले आहे.
Divisional Commissioner Game Fake WhatsApp Account
Cyber Crime