इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील हॅण्डसम गायक आणि बिग बॉस स्पर्धक राहुल वैद्य सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमारशी राहुलने लग्न केले. आता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. राहुल आणि दिशाने आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे. १६ जुलै २०२१ रोजी राहुल आणि दिशाने लग्नगाठ बांधली. बिग बॉस १४च्या घरात असतानाच राहुलने दिशाला प्रपोज केले होते.
पोस्टमध्ये काय?
राहुल – दिशेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही फोटो आहेत. फोटोत त्या दोघांच्या हातात एक पाटी असून त्यावर आई आणि बाबा असे लिहिले आहे. तर दुसरा फोटो सोनोग्राफी रुममधला आहे. हा बाळाचा अल्ट्रासाऊंड फोटो दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “आई-बाबा आणि बाळातर्फे सर्वांना नमस्कार” अशी कॅप्शन देखील दिली आहे. या फोटोंमध्ये राहुलने काळ्या रंगाचा टीशर्ट, काळ्या रंगाची जीन्स तर दिशाने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. या वनपीसमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे.
सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
राहुल आणि दिशाने दिलेल्या या गुड न्यूजनंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मौनी रॉय, जस्मीन भसीन, वरुण सूद, अनिता हसनंदानी, अली गोनीसह अनेक सेलिब्रिटींनी राहुल आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहेत.