अजय सोनवणे, मनमाड
ऑयल कंपन्यांनी डिझेलसाठी अघोषित कोटा सिस्टीम लागू केला असून डीलरला मागणीच्या २० टक्केच डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात बहुतांश पंपावर डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. इंधन टंचाईमुळे डिझेलवर चालणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत असून पंप चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. डिझेल टंचाई आणि अघोषित कोटा सिस्टीम बाबत कंपनीच्या अधिकारी मात्र या विषयावर बोलण्यास तयार नाही.