विशेष प्रतिनिधी, पुणे
चक्रीवादळ, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती सातत्याने येत असतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन फोर्स (एनडीआरएफ) आणि संरक्षण दलांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्यांचे पथक बाधितांसाठी धावते, मदतकार्य करते. यामुळे बाधितांना वेळेत मदत मिळते. जिवीतहानी कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते. आपत्ती व्यवस्थापनात एक उदयोन्मुख फील्ड आहे, जिथे बहुमुखी करियरची शक्यता आहे. मोठी गोष्ट म्हणजे त्यात मानवता आणि सेवेचा अपार आनंद आहे. जागतिक तपमान वाढ आणि हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत वाढ होण्याचा इशारा वारंवार दिला जातो. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याला मोठा वाव आहे. आपत्ती व्यवस्थापनशास्त्रामधील शिक्षण आणि करिअर संधींविषयी आपण जाणून घेणार आहोत….









