नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, मिशन इंस्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन, नागपूर आणि फ्रीडम ट्रस्ट, चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने फ़क्त नाशिक जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील ज्या दिव्यांग व्यक्तीना पाय नाही अशा दिव्यांग व्यक्तीकरिता काँर्पोरेट सामाजिक दायित्व निधिअंतर्गत नि:शुल्क कृत्रिम पाय देण्याकरिता निवड व मोजमाप शिबिराचे आयोजन शनिवार, दिनांक 19 फेब्रुवारी, 2022 रोजी, स्थळ: कुसुमाग्रज स्मारक, विद्यविकास सर्कल गंगापुर रोड, नाशिक येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता पर्यंत करण्यात येत आहे. या मोजमाप कार्यक्रमात मोजमाप करण्यात येणा-या पात्र लाभार्थ्याना पुढील 20 दिवसात त्यांच्या मोजमापानुसार कृत्रिम पाय नि:शुल्क देण्यात येईल.
फ्रीडम ट्रस्ट, ही चेन्नईची नामांकित संस्था असून त्यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम साहित्य वापरून तयार केलेले कृत्रिम पाय दिव्यांग व्यक्तीना नि:शुल्क देण्यात येतात आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या पायावर उभे करून सक्षम बनवितात. नाशिक जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील ज्या दिव्यांग व्यक्तीना पाय नाही अशा दिव्यांग व्यक्तीनी नि:शुल्क कृत्रिम पाय तपासणी व मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहान करण्यात येत आहे. शिबिराला येतांना दिव्यांग व्यक्तींनी स्वत;चे आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा एक फोटो घेऊन शिबिरस्थळी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी निलीमा हरोडीया 7558495140, सुंदर हरोडीया 7262801201 व राजू देसले 7720052572 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले आहे.