इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राम गोपाल वर्मा हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, काही वर्षांपासून ते सातत्याने वादात सापडत आहेत. आता नुकतेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या व्हायरल फोटोमुळे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. या फोटोवरूनच लोकांनी त्यांना खूप ट्रोल केलं आहे. एका अभिनेत्रीच्या पायांना किस करताना त्यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. या व्हायरल व्हिडिओत राम गोपाल वर्मा अभिनेत्री आशु रेड्डीच्या पायांना किस करताना दिसत आहे. आशु रेड्डी ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण आता राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच्या फोटोमुळे ती आणखीन चर्चेत आली आहे.
आशू रेड्डी ही तेलुगु इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस तेलुगु’ सीझन ३ मध्ये ती सहभागी झाली होती. सोशल मीडियावर फारच सक्रिय असते ती. आशुचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. एमबीए असलेल्या आशू रेड्डी हिने २०१८ मध्ये पहिला सिनेमा केला होता. सध्या ती राम गोपाल वर्मा यांच्यामुळे पुन्हा वादात सापडली आहे. या व्हिडिओमध्ये ते सेक्स, पॉर्न आणि पर्सनल लाइफबद्दल बोलत आहेत. दोघांमधील प्रश्न आणि उत्तरे ऐकून इंडस्ट्रीतील लोकही हैराण आहेत. यामुळेच पुन्हा एकदा हे दोघेही चर्चेत आले आहेत. आशु रेड्डी ही अभिनेता पवन कल्याणची खूप मोठी चाहती आहे. तिने पाठीवर पवन कल्याणच्या नावाचा टॅटूही काढला आहे.
If U Are bad
I Am Your Dad ?
– #ramgopalvarma ? pic.twitter.com/uYiGBIlF9p— Priyanka Stan Mohan™ (@userblast) December 7, 2022
Director Ram Gopal Varma Controversial Video