इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वेगळ्या विषयाचे, वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार करण्यासाठी नागराज मंजुळे प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांचे चित्रपट हिट होतात. प्रेक्षकांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच नागराज यांचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. असे हे नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढणार होते, पण काही कारणामुळे हा चित्रपट काही अद्याप समोर आलेला नाही. याबाबत नुकताच मंजुळे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी खुलासा केला.
नागराज अण्णांनी जवळपास तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होता.
‘फॅंड्री’नंतर नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट आला आणि त्यातील ‘झिंगाट’ गाण्याने सर्वांनाच वेड लावलं. या सिनेमातील रिंकू आणि आकाशच्या अभिनयाची, नागराज यांच्या दिग्दर्शनाची, सिनेमातील गाण्यांची प्रचंड चर्चा झाली. २०१६ मध्ये ‘सैराट’ प्रदर्शित झाला आणि यामुळे नागराजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. नागराज मंजुळे यांनी तीनेक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. पण दोन वर्षे उलटून गेली तरी हा सिनेमा काही मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. या सिनेमाचं नेमकं काय झालं, असा प्रश्न नागराज यांच्या चाहत्यांना पडतो. नुकत्याच एका मुलाखतीत नागराज यावर बोलले. महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा हा माझा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की येईल. शिवाजी महाराजांवरचा चित्रपट सर्वोत्कृष्ट व्हावा, अशी माझी इच्छा आहे. या चित्रपटासाठी मला कसलीही घाई करायची नाही. सिनेमा करायचा म्हणून करायचा आणि मग मी केला, असं मिरवायचं अशी माझी टेंडन्सी नाही. हा चित्रपट केल्यानंतर काहीतरी भारी केल्याची भावना मला आयुष्यभर सोबत ठेवायची आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्यावर काम करतोय. त्यामुळे छत्रपती शिवरायांवरचा हा सिनेमा नक्की येणार आहे, एवढं मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो आहे. छत्रपतींवरचा सिनेमा आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे, तो तितक्याच जबाबदारीने पेलता यायला हवा, असं नागराज म्हणाले. नागराज लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा ?? pic.twitter.com/r4GaizGCeE— Nagraj Popatrao Manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
Director Nagraj Manjule on Chhatrapati Shivaji Maharaj Film