नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी)विविध सरकारी विभागांतील रिक्त पदांवर नेमणुकीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्रालयातील कायदेशीर व्यवहार विभागातील कायदेविषयक पदांवरील भरतीसाठी ३८ रिक्त जागा; राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (एनसीएससी) आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या संयुक्त केडरमधील सहाय्यक संचालकाच्या पदासाठी ३ रिक्त जागा; केंद्रीय शालेय शिक्षण विभागात व्याख्यात्यांच्या (उर्दू) १५ रिक्त जागा;केंद्रीय आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील वैद्यकीय अधिकारी पदाच्या १२५ रिक्त जागा आणि लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील वित्त विभागात लेखा अधिकारी पदावरील भरतीसाठी ३२ रिक्त जागा यांचा या पदांमध्ये समावेश आहे.
- यासंदर्भातील तपशीलवार जाहिरात क्र.13/2025 सह उमेद्वारांसाठीच्या सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsc.gov.in. या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील. इच्छुक उमेदवारांना https://upsconline.gov.in/ora/ या ऑनलाईन भर्ती अर्ज पोर्टलच्या माध्यमातून दिनांक १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालमर्यादेत अर्ज सादर करता येतील.
- उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या तपशीलवार सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.