विशेष प्रतिनिधी, मुंबई
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी (डी फार्मसी)ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कार्यक्रम तंत्रशिक्षण संचालनालयानकडून जाहीर करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम CAP (सेन्ट्रल ऍडमिशन प्रोसेस) म्हणजे केंद्रीभूत पध्दतीने भरल्या जाणाऱ्या जागांसाठी आहे. अर्ज स्विकारण्याची सुरूवात दिनांक १० जुलै व अंतिम दिनांक ०२ ऑगस्ट आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.
अर्ज केल्यानंतर Documents verification म्हणजे कागदपत्रे पडताळणी व Application confirm ( अर्ज निश्चिती ) दोन पद्धतीने करता येईल. नवी ( इ.स्क्रूटीनी ) पध्दत ज्यामध्ये तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या घरूनच Android /Smart Phone, Laptop, Cyber Cafe मधून अर्ज करता येईल व मुळ कागदपत्रे (Original Copies) Scan करून Upload करता येतील.ह्या पर्यायात तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचे कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने तपासली जातील. त्रुटी असेल तर तुमच्या लॉगीन मध्ये दुरुस्ती साठी परत पाठविण्यात येईल.
संबंधित त्रुटी दुरुस्ती नंतर तुम्ही अर्ज परत पडताळणीसाठी पाठवायचा आहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थीत असल्यास तुमचा अर्ज निश्चित (Confirm) केला जाईल, तसेच तुमच्या लॉगीन मध्ये तसे दिसेल.
जुनी पद्धत
ही पध्दत मागील वर्षाप्रमाणे आहे ज्यात कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती दोन्ही सुविधा केंद्र म्हणजे Facilitation Center ( FC) ला जाऊन अर्ज व कागदपत्रे पडताळणी करता येईल. अधीकृत सुविधा केंद्राची यादी https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज निश्चिती (Application confirmation) नंतर तात्पुरती गुणवत्ता यादी दिनांक *05 ऑगस्टला* प्रसिद्ध होईल. तात्पुरत्या यादीत आपले नाव, संवर्ग,लिंग, जन्म तारीख, व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.
कुठल्याही प्रकारची दुरुस्ती असल्यास ती दिनांक ०६ ते ०८ ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज निश्चिती साठी निवडलेल्या पद्धतीप्रमाणे योग्य ते Documents दुरुस्तीसाठी सादर करावी .
अंतीम गुणवत्ता यादी दिनांक १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल.यादीत आपण तात्पुरत्या यादीतील दुरुस्ती केली असल्यास ती त्याप्रमाणे झाली असल्याची खात्री करून घ्यावी.
यानंतर पर्याय निवडणे, प्रवेश निश्चित करणे याबाबतचा पुढचा कार्यक्रम तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल. (सुचना : Online अर्ज करण्यासाठी तंत्रशिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी खुला वर्गासाठी ( Open Category ) रू. 400/- व राखिव वर्गासाठी ( Reservation Category ) रू. 300/- एवढे शुल्क (Fee) ठेवले आहे. तसेच Fee Online Mode ( Debit / Credit Card, Net.Banking etc.) ने भरायची आहे.