इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री दीपिका पादुकोणला मुंबईत एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात काल डिलीवरीसाठी दाखल करण्यात आले होते. आज तीने मुलीला जन्म दिला. दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिध्दिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळेस दीपिकाबरोबर तिच्या कुटुंबातील इतरही सदस्य रूग्णालयात दाखल झाले होते.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका बाळाला जन्म देत आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळी दीपिका पादुकोण ही फोटोंसाठी पोझ देताना देखील दिसली होती