इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री दीपिका पादुकोणला मुंबईत एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात डिलीवरीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे दीपिका पादुकोण कोणत्याही क्षणी आपल्या बाळाला जन्म देऊ शकते असे बोलले जात आहे.
दिपिकाबरोबर तिच्या कुटुंबातील इतरही सदस्य रूग्णालयात दाखल झाले आहेत. याअगोदर दीपिका पादुकोण ही २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका बाळाला जन्म देत आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळी दीपिका पादुकोण ही फोटोंसाठी पोझ देताना देखील दिसली होती