नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर तीन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी दीपक बडगुजर यांचे नाव सांगितल्याचा आता बोलले जात आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने नाशिकचे पोलिस आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचे नाव घेण्यासाठी दबाब आणत असल्याचे सांगितले.