नाशिक – राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना नाशिक जिल्ह्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अध्यक्ष स्थानी महसूल विभाग तर सरचिटणीस पदी जलसंपदा विभाग यांना संधी मिळाली. नाशिक जिल्ह्याच्या कार्यकरिणीवर या पदाधिका-यांची निवड करण्यात आली…
दिनेश वाघ- जिल्हाध्यक्ष (महसूल विभाग)
जगदीश घोडके- जिल्हाउपाध्यक्ष (कोषागार कार्यालय विभाग)
श्रीमती सुनंदा जरांडे- जिल्हा सरचिटणीस (जलसंपदा विभाग)
श्रीमती पूजा पवार- जिल्हा कार्याध्यक्ष (आरोग्य विभाग)
गोविंदा लहामगे- जिल्हा कोषाध्यक्ष (वन विभाग)
या बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकरिणीवर प्रत्येक विभागाचा एक पदाधिकारी उर्वरित पदांवर घेतला जाईल, अशी घोषणा ही करण्यात आली. नाशिक जिल्हा कार्यकरिणी सर्व विभागांना घेऊन सर्व समावेशक केली असल्याने उपस्तिथ सर्व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीच्या वेळी महसूल विभाग, जलसंपदा विभाग,वस्तू व सेवा कर विभाग,वन विभाग,कोषागार कार्यालय,आदिवासी विभाग,धर्मदाय आयुक्त, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सहकार विभाग, पशुसंवर्धन विभाग, तंत्र शिक्षण विभाग, मध्यवर्ती कारागृह विभाग, राज्य कामगार विमा योजना कार्यालय, पोलीस आयुक्त विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी व वर्ग ४ संघटना इ.संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महसूल विभागाचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, राज्य सहकोषाध्यक्ष सुधाकर सुर्वे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे हे खास मुंबईहून उपस्थित होते. याप्रसंगी महसूल विभागाचे जीवन आहेर, रमेश मोरे, तुषार नागरे, अरूण तांबे, अर्चना देवरे संजय शिंदे, धनश्री कापडणीस यांनी महसूल विभागाला मिळालेला मानाच्या स्थानाचे जल्लोषात स्वागत केले.