दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार २२ रोजी सकाळी दहा वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,पालकमंत्री छगनराव भुजबळ यांचे हस्ते व विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे,व्हा.चेअरमन उत्तमराव भालेराव,कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी दिली. गळीत हंगाम शुभारंरभ सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी सौ.व श्री. सोमनाथ मुळाने, सौ.व श्री.सुरेश कोंड,सौ.व श्री.चिंतामण मोरे,सौ.व श्री.निवृत्ती देवरे,सौ.व श्री.वसंतराव पगार यांचे हस्ते गव्हाणपूजा होणार आहे. तरी सदर गळीत हंगाम शुभारंभास सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कोव्हिडचे नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन उत्तमराव भालेराव, कार्यकारी संचालक हेमंत माने व संचालक मंडळाने केले आहे.