मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात दिंडोरी विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे धनराज महाले यांनी उमेदवारी मागे घेतली. थेट एेनवेळी हेलिकॅाप्टरने एबी फॅार्म पाठवून धनराज महाले यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानंतर आता धनराज महाले यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार नरहरी झिरवाळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनीता चारोस्कर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे पवारांच्या दोन्ही गटात येथे निवडणूक रंगणार आहे.
या उमेदवारांना मिळाले हे चिन्ह
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार) -घड्याळ
सुनीता चारोस्कर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार) -तुतारी वाजवणारा माणूस
गोरख गोतरने – बहुजन समाज पार्टी – हत्ती
चंदर गायकवाड ( निर्भय महाराष्ट्र पार्टी) – सीसीटीव्ही कॅमेरा
भारत गायकवाड ( भारत ट्रायबल पार्टी) -ऑटो रिक्षा
योगेश भुसार ( बहुजन वंचित आघाडी) – गॅस सिलेंडर
दीपक जगताप (अपक्ष) – शिट्टी
निवृत्ती गालट (अपक्ष)- कढई
मुरलीधर कनोजे (अपक्ष) -एअर कंडिशन
वसंत शेखरे – (अपक्ष) -व्हील baro
सविता गायकवाड (अपक्ष) -बासरी
सुशीला चारोस्कर (अपक्ष) – ट्रॅमपेट
संतोष रेहरे ( अपक्ष) -रोडरोलर