दिंडोरी – तालुक्यातील परमोरी गावांजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मुत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी (दि.19) दुपारी दोन वाजेच्या सुमारास लखमापुर फाटा ते वरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर परमोरी गावाजवळील मारुती मंदिरासमोर भीषण अपघात झाला. टाटा कंपनीची आयसर (क्रमांक एम.एच-43 यु -7207) व बजाज प्लँटीना मोटारसायकल (क्रमांक
एम.एच.-15 एच डी 3893) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात मोटारसायकल वरील मोतीराम गंगाधर गवळी (वय -60) हे जागीच ठार झाले. तर, गोरख मोतीराम गवळी (वय -40) हे गंभीर जखमी झाले. चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील ते रहिवासी आहेत. ऐन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गावाजवळ अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.