दिंडोरी – दिंडोरी शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा खंडीत झाले असून नियमितपणे पाणीपुरवठा सुरु करावे, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे. शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाल्यामुळे महिला वर्गांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणी दोन तीन दिवस येणार नाही याबाबत सूचना मिळत नाही. यापुढील काळात मोटारी नादुरुस्त होण्याचे प्रमाण बंद होणे गरजेचे आहे व पाण्याबाबत तक्रारी दूर होणे गरजेचे आहे. तरी शासनाने त्वरीत दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.